कृणाल वाघ याची निवड

KolhapurLive
     आजरा : बालेवाडी ( पुणे ) येथे झालेल्या शासकीय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील कृणाल वाघ याने , क्रॉसकंट्री ( सहा किमी धावणे ) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला . त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोज देसाई , कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाशिक्षक प्रा.अल्बर्ट फर्नांडिस, प्रा. डी.जे.पाटील याचे मार्गदर्शन लाभले.