गडहिंग्लज : गिजवणे ( ता. गडहिंग्लज ) येथील महालक्ष्मी देवीची यात्रा १६ वर्षानंतर होत आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहाच्या कामास प्रारंभ केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील व 'गोडसाखर'चे माजी संचालक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ झाला.आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून व सतीश पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी 2५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कामाच्या प्रारंभप्रसंगी सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, सदस्य आदित्य पाटील ,भूषण गायकवाड, अमित देसाई, शशिकला पोटजाळे आदी उपस्थित होते.