गांधी विचारांचा अत्याळला जागर

KolhapurLive


गडहिंग्लज  ता. ३१ : अत्याळ (ता.  गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये महात्मा  गांधी विचारांचा  जागर  केला. प्रा. अशोक पट्टणशेट्टी  यांचे  व्याख्यान झाले. गडहिंग्लजच्या गांधी विचार ‌मंचच्यावतीने  हा कार्यक्रम झाला. गांधींचे जीवन व कार्य म्हणजे  भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत प्रतिबिंबी होय. गांधीजींच्या प्रत्येक कृतीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांनी सांगितलेला  मानवतेचा धर्म हाच जगातील सर्व  संघर्षावरील उपाय असल्याचे मत प्रा. पट्टणशेट्टी यांनी व्यक्त केले . कल्याणराव पुजारी यांनी गांधीचे जीवन अभ्यासणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आप्पासाहेब कमलाकर यांचे भाषण झाले. मुख्याध्यापक एन. एल.कांबळे  यांनी स्वागत केले. पी.आर. पवार  यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माधुरी अडसुळे यांनी  सूत्रसंचालन केले.