गडहिंग्लज ता.३१ : येथील हिरण्यकेशी नदीकाठावरील वैकुंठभूमीची दुरवस्था झाली आहे. याची तात्काळीन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना निवेदन दिले आहे.
वैकुंठभूमी शवदाहिन्या अपुऱ्या आहेत. काही दाहिन्या खराब झाल्याने काढून टाकल्या आहेत, परंतु तेथे अद्याप नवीन दाहिण्या बसवलेल्या नाहीत. यामुळे मृतदेहाच्या दहनाला अडचण होत आहे. समशानभूमीवरील पात्रही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत . तो केव्हा पडेल, याची शाश्वती नाही. स्मशानभूमी विजेची व्यवस्था नाही. प्रवेशद्वारी नादुरुस्त झाले आहे.ही कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.अन्यथा आंदोलन छेडण्याचे इशारा दिला आहे.
आप्पा शिवणे, संजय पाटील ,राहुल नागवकर ,राजू रोटे, गौतम देवाडे, सागर कुराडे, मनोज पवार,ज्ञानेश्वर खटावकर, संतोष पाटील, राजू तोंदले, चंद्रकांत सावंत, श्रीकांत देसाई ,मारुती मोर्डी, संजय देसाई, विश्वजित खोत आदीच्या निवेदनावर सह्या आहेत