गडहिंग्लज , ता. २ : ज्ञानदीप प्रबोधिनीच्या झेप ॲकॅडमीच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी येथील स्थावर मिळकत खरेदी- विक्री सल्लागार राजेंद्र मोर्डी यांनी दिड लाखाची देणगी दिली . त्यानिमित्त त्यांचा ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक एम.एल.चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. मोर्डी यांनी झेप ॲकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. चौगुले यांनी भरीव देणगीद्वारे ज्ञानदीपला पाठबळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . या वेळी ज्ञानदीपचे उपाध्यक्ष डाॅ. बी. एस. पाटील, रंगा शिंगटे, प्राचार्य डॉ.आर.एस. निळपणकर, महेश मजती, डॉ. आप्पासाहेब आरबोळे, डाॅ. समीधा चौगुले, मीना रिंगने, रशिदा शेख उपस्थित होते. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. ॲकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी आभार मानले.