गडहिंग्लज : येथील ओमकार कला , वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व राजषी॔ शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी तेजस कांबळे यांची अग्रिवीर जीडी विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा व पालक किरण कांबळे यांचा सत्कार संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर व प्राचार्य डॉ.सुरेश चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्याला डॉ. सुरेश चव्हाण , प्रशांत कांबळे , डॉ.संजीवनी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.डॉ. गंगाधर चोले , प्रा. सागर सावंत , प्रकाश कांबळे उपस्थित होते.