महागाव: येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप केले. महागावातील शब्बीर बागवान व आयेशा बागवान यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम झाला. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, संस्थेचे सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याबद्दल संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी बागवान, कुटुंबाचे आभार मानले. यावेळी बकश बागवान, महमदहानिफ पठाण, रमजान बागवान, महदनसीम मुजावर, मोसिन बागवान, नूरजहाँ बागवान आदी उपस्थित होते.