गडहिंग्लज : मुख्याध्यापक संघातर्फे देण्यात येणारा स्वच्छ , सुंदर शाळा पुरस्कार येथील साधाना प्रशालेला मिळाला . निवृत्त शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापुरे ,उपशिक्षणाधिकारी श्री. टोणपे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ , सतिश पाटोळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. प्राचार्य जी .एस. शिंदे , पर्यवेक्षक आर .एन. पटेल, संचालक अरविंद बारदेस्कर , शिक्षक व कर्मचाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. के.बी. पोवार, बी.जी. काटे , डी.के. परीट, आनंदराव वाघराळकर यांनी परीक्षण केले होते. संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिन जे.बी. बारदेस्कर यांचे प्रोत्साहन मिळेल.