गडहिंग्लज : हिरण्यकेशी जलविहार मंडळ आणि आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, गडहिंग्लज नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी नदीघाटावर खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धा विविध सात गटात घेण्यात येणार आहेत.प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षीस, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चौथा व पाचव्या क्रमांकाला उत्तेजनार्थ बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी मारुती खोत ,अशोक नारागोळ , गडहिंग्लज यांच्याशी संपर्क साधावा,असे आव्हान संयोजकांनी केले आहे.