जांभुळवाडीत विहिरीत बुडून वृद्धेचा मृत्यू

KolhapurLive

नेसरी : जांभुळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील  सार्वजनिक  विहिरीत  पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुशिला विष्णू  नौकुडकर (वय ६९) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत पती विष्णू जखोबा नौकुडकर (वय ६९) यांनी नेसरी पोलीस ठाण्यात वर्दी दिली‌. सुशिला या आपल्या आजारासह  कंटाळल्या होत्या. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. कांबळे करत आहेत.