नागपूर कसोटीचा पहिला दिवस भारतीयांच्या नावावर राहिला. गुडघ्यावरील शस्त्रक्रीयेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja five wickets) घेतल्या. आर अश्विनने ( R Ashwin) तीन विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली अन् कसोटीत ४५०+ विकेट्सचा टप्पा ओलांडणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर रोहित शर्माने अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियाचे टेंशन वाढवले. लोकेश राहुलची त्याला संयमी साथ मिळाली.
भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आणि त्यात अनुभवी आर अश्विन ( R Ashwin) यानेही ३ विकेट्स घेतल्या. सप्टेंबर महिन्यात गुडघ्यावर सर्जरी झाल्यानंतर जडेजा क्रिकेटपासून दूर होता आणि फेब्रुवारीत पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या.जडेजाने ४७ धावांत ५, तर अश्विनने ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.