सारथी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ओंकार महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्र

KolhapurLive
   केद्रीय अर्थसंकल्पाचा आणि समाज जीवनाचा अत्यंत जवळचा संबध आहे. देशातील शेतकरी, शेतमजूर, महिला, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, विविध सामाजिक घटक , पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी संदर्भातील आर्थिक तरतुदींचे विवरण अंदाजपत्रकात केले जाते.सामान्य माणसाच्या भाकरीचा प्रश्न अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. परंतु अर्थसंकल्प समजून घेणे ही फार अवघड गोष्ट आहे. तो सर्वांना समजला पाहिजे या उद्देशाने ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज यांच्या सयुक्त विद्यमाने शनिवार दि.११ फ्रेब्रुवारीला २०२३ रोजी दुपारी ठिक ३.०० वा ओंकार महाविद्यालयाच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 
      शिवाय विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.पी.एस.कांबळे हे 'केद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ एक चिकित्सा ' या विषयावर मांडणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजनदादा पेडणेकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये चाटर्ड अकाउंट नंदकुमार शेळके , गडहिंग्लज चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष राजेश बोरगावे, कोल्हापूर जिल्हा सराफ असोसिएशनचे दीपक वेर्णेकर ॲग्राचे डिस्ट्रीब्यूटर संदीप कुलकर्णी असतील.तरी गडहिंग्लज शहरातील अर्थसंकल्प जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा.सुनील शिंत्रे व प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी केले आहे.