गडहिंग्लजला मंगळवारी काळभैरव यात्रा

KolhapurLive
    गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या येथील ग्रामदैवत काळभैरीवची यात्रा मंगळवारी ( ता.७ ) होणार आहे. उद्या सोमवारी ( ता.६ ) सायंकाळी पालखी सोहळा होईल. यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी, बहिरेवाडी ( ता.आजरा ) आणि कर्नाटकातील हडलगे ( ता.चिक्कोडी ) येथेही ही यात्रा साजरी केली जाते. एक दिवसाच्या या यात्रेत दर्शनासाठी गोवा लगतच्या कर्नाटकासह महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात कोरोनामुळे दोन वर्ष ही यात्रा झाली नाही. यात्रेदिवशी वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूरची वाहतूक जाताना शेंद्रीमार्गे तर येताना वडरगेमार्गे वळविण्यात आली आहे. दहा अधिकारी आणि दिडशे पोलीस विभागाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजता येथील शिवाजी चौकातील काळभैरी मंदिरातून पालखी यात्रास्थळी रवाना होईल. या पालखीच्या दर्शनासाठी अवघे गडहिग्लजकर  मार्गावर अवतरणात मानकरी, पुजारी यांच्या उपस्थितीत ही पालखी यात्रास्थळी रवाना होईल. या पालखी सोहळ्यात मानाच्या सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची प्रथा आहे.