चंदगड ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवालयाची यात्रा

KolhapurLive

   चंदगड : येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस ८ फेब्रुवारी असला तरी यात्रा ७ ते १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर येथील भाविकांचे श्री देव रवळनाथ श्रद्धास्थान आहे. यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून मंदीर परिसराबरोबर देवदेवतांच्या मूर्तीची स्वच्छता, यात्रोत्सव   काळात लावण्यात येणारी दुकाने, पाळणे व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रवळनाथ देवस्थान ट्रस्ट  सज्ज झाले आहे. मंगळवार दि. ७ रोजी लघुरुद्र, अभिषेक, गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंधळाची आरती, बुधवार दि.८ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस, महाआरती, पालखी, सासनकाठी, गुरुवार दि.९ रोजी देव चाळोबा यात्रा, शुक्रवार दि.१० रोजी देवी सातेरी, भावेश्वरी यात्रा, शनिवार दि.११ रोजी श्री देवी ईठलाई यात्रा,रविवार दि.१२ रोजी जुन्या हरक्या फेडणे यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.

    
‌‌‌‌‌