चंदगड येथे स्वच्छता मोहीम

KolhapurLive


 चंदगड नगरपंचायत व रवळनाथ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त व स्वच्छता सर्वेक्षण २०२३ व माझी वसुधरा ३.० अंतर्गत देव रवळनाथ मंदिर परिसर व मंदिर गाभारा स्वच्छ करण्यात आला.
        तसेच जनजागृती व महाहरित शपथ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राची कणेकर नगरसेविका नेत्रदीपका कांबळे, अनिता परीट, अनुसया दाणी,माधुरी कुंभार, करनिर्धारित अधिकारी श्रीराम डाके, शहर समन्ययक राजेंद्र दळवी, ओंकार सबनीस, ओंकार माने, मयूर कांबळे, दिव्यस्वप्न फाउंडेशन टीम,रवळनाथ हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक करण्यात आले.