गडहिंग्लज : येथे शिवराज महाविद्यालय संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे डॉ. राजेंद्र गुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रस्तावित डॉ. एस डी सावंत यांनी केले.डॉ. राजेंद्र गुंडे यांनी संत गाडगेबाबा यांनी समाजाच्या प्रबोधन कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याकाळी त्यांनी समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा व अन्य भ्रमक रूढीचे उच्चाटन करून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या कार्याची नोंद होऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एम कदम यांनी नव्या पिढीने संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा,असे आव्हान केले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष जाधव, पर्यवेक्षक, प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.