आजरा : कै. केदारी रेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पेद्रेवाडी येथील रेडेकर हायस्कूल च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेत देवर्डेच्या रवळनाथ हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर होत्या.
बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूल ने द्वितीय तर रोजरी हायस्कूल आजरा यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना ३००१,२००१,१००१ अनुक्रमे रोख रक्कम देण्यात आली. उत्कृष्ट संघ म्हणून आर्दाळ हायस्कूलला गौरविले. यावेळी रेडेकर यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल टीव्ही यामध्ये न अडकता मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. यावेळी विस्तार अधिकारी विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, संजय येसादे, पेद्रेवाडीच्या उपसरपंच स्मिता चव्हाण, सदस्य राजश्री डोंगरे, पांडुरंग ढवळे, वसंतराव चव्हाण, बबन काटकर, सुनील डोंगरे, बाळू चव्हाण, एस एम पाटील, संतोष कदम, मांगले, हनुमंत सुतार, डोंगरे, अभिजीत माळवे, संस्थेचे सचिव पांडुरंग शिप्पूरकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर उपस्थित होते. स्पर्धेसाठी उत्तम जाधव, विलास मोहनगेकर, विश्वनाथ देवुसकर, रमेश डोंगरे, दिलीप रहाटवळ, जयवंत कांबळे, प्रशांत चौगुले, संदीप जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आर एस पाटील यांनी केले. तर मुख्याध्यापक एस. एम. चव्हाण यांनी आभार मानले.