गडहिंग्लज : कौलगेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुधा मूर्ती संगणक कक्षाचे उद्घाटन जि.प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली होते. यावेळी मुख्याध्यापिका एस एम इनामदार, श्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नागप्पा माळगी, विनोद नाईकवाडी, विलास कुलकर्णी, भीमाप्पा मास्तोळी, रामगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, मन्सूर मुल्ला, शफिकअमद इनामदार, संजय गाडे, स्वाती पाटील, बळीराम पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, विश्वजीत चव्हाण, बाळासाहेब मोहिते, सुनील माने, शामराव वडर, यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. आभार नामदेव यादव यांनी मानले.