कोल्हापूर, ता. ९ : सौंदत्ती यात्रेसाठी तीन दिवसातील ३७० किलोमीटर प्रवासासाठी ४o रुपये प्रमाणे प्रवास भाडे दर आकारणी करावी, अशी मागणी करवीर निवासिनी रेणुकाभक्त सेवा संस्था केली आहे. अन्यथा आम्ही कर्नाटक प्रवासांच्या बस सेवा
यात्रेसाठी वापरू, आशा इशाराही देण्यात आला याबाबत एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक सुजाता बारटक्के यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या वर्ष डिसेंबर महिन्यात सौंदत्ती यात्रा रेणुका देवीची यात्रा होणार आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातून हजारो भाविक यात्रेला जाणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडे गाड्यांचे प्रसंगीत करारावर बुकिंग केले जाते. त्यासाठी तीन दिवसाच्या प्रवासासाठी पूर्वी ३४ रुपयाप्रमाणे दर आकारला जात होता. त्यात वाढ करून हा दर ५५ रुपये केला आहे. त्यामुळे एका गाडीतील ५० भाविक प्रवाशांसाठी ४९ हजार ५०० यावे लागतात. हा दर भाविकांना न परवडणारा आहे. त्यामुळे प्रवासी दर हा 40 रुपये प्रमाणे आकारला जावा अशी मागणी संस्थेने केली आहे
संस्थेचे पदाधिकारी प्रशांत खांडे, विजय पाटील, सुनील मोहिते, उदय पाटील, मंगल महाडिक, सुरेश बिरंबळे, श्रीकांत कराडे, प्रदीप साळुंखे, अनिल दावणे, राजेंद्र पायमल आदींनी हे निवेदन दिले