"शाळा बंद" विरोधात शनिवारी धरणे

KolhapurLive

गडहिंग्लज: शालेय शिक्षण विभागाने वीसपटाखालील शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. या विरोधात शनिवारी (ता. १२) धरणे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने आयोजित केले आहे.
     शासनाच्या या निर्णया विरोधात आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. २० पटाखालील शाळा बंद झाल्यास सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी कालबद्ध आंदोलन केले जाणार आहे. शनिवारी (ता.१२) पंचायत समिती शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन, ३ डिसेंबरला साखळी उपोषण, तर १६ डिसेंबरला रॅली काढली जाणार आहे राहुल कांबळे,एस जी उंडगे ,जोतिबा सुतार, इंद्रजीत जाधव,अमित कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.