राधानगरी : दाजीपुरातील जिल्हा परिषदेचे विश्रामगृह तातडीने पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राधानगरी शाखेने केली आहे. या संदर्भातील निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने राधानगरीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी यांनी दिली. विश्रामग्रह भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचे निवेदन प्रक्रियेबाबत चालढकलच सुरू आहे. यंदाच्या पर्यटन हंगामातच विश्रामगृहात पर्यटकांना निवास व्यवस्था सुरू करावी. अन्यथा मनसेतर्फे लोकापर्ण कार्यक्रम घेऊन विश्रामगृह पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल, अशा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करून, निविदा कार्यावाही लवकरात लवकर होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. मनसे तालुकाअध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात शहराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष रोहित कानकेकर, उत्तम चव्हाण, संदीप चव्हाण, मारुती सातपुते, रणजीत पाटील आदींचा समावेश होता.