पहिल्या सत्रात छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीवर

KolhapurLive
गडहिंग्लज : आज सकाळपासून गडहिंग्लज गोड साखर कारखान्याची मतमोजणी सुरु झाली आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (गोडसाखर) संस्था गटातील विजयानंतर कडगाव-कौलगे गडहिंग्लज-हनिमनाळ,  गटातील बहुतांश केंद्रांवर मुश्रीफांच्या छ. शाहू समविचारी आघाडीला मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे. जवळपास २० केंद्रांअखेर १३१४ हून अधिक मतांची आघाडी मुश्रीफांच्या पॅनेलने घेतली आहे.

गडहिंग्लज शहरात जनता दलाचे वर्चस्व असल्याने या ठिकाणी मुश्रीफांच्या पॅनेलला कमी मतदान व आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीला अधिक मतदान होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणीही चांगल्या पद्धतीची आघाडी घेण्यात काळभैरव आघाडीला अपयश आले आहे.

सकाळी संस्था गटात आ. मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. शिवाजी खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले.