चंदगड : दौलत साखर कारखाना सुरू करणे अथर्व इंटरटेड प्रो. लि. कंपनीची जबाबदारी आहे. कारखाना लवकरात लवकर चालू करावा , अन्यथा होणाऱ्या नुकसानीस कंपनी जबाबदार राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवानंद हुंबरवाडी यांनी निवेदनद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक व अथर्व इंटरटेड कंपनी यांच्यामध्ये दि. ३० मार्च २०१९ रोजी दौलत कारखाना चालवायला देण्याबाबत करार झाला आहे. करारप्रमाणे १६२.४७ कोटी रुपये देणी देण्याची जबाबदारी स्वीकारून ३९ वर्ष मदतीने अथर्व इंटरट्रेड प्रा. लि.कंपनीने दौलत कारखाना चालवायला घेतला आहे. त्याप्रमाणे कंपनीही चालक आहे. त्याप्रमाणे करारातील अटी, शर्थास बांधील राहून कारखाना सुरू करावा. मानसिंग खराटे कारखान्याचे चालक आहे. चालू वर्ष शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याची जबाबदारी कारखाना व्यवस्थापनाची असून त्यांनी ती पूर्ण करावी, असे आव्हान शिवानंद हुंबरवाडी यांनी केली आहे.