उत्तुर : येथील पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्यावतीने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या वर्षावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता व्याख्यान सुरू होणार आहे. येथील पार्वती शंकर शैक्षणिक संकुलनाच्या हॉलमध्ये व्याख्यान पार पडणार आहे. पहिल्या सत्रामध्ये आय.टी. मुंबईचे सिनीअर प्रोफेसर बी. एन. जगताप हे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: सरचानात्मक आणि सुधारणाची अंमलबजावणी ' या विषयवर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये माजी उच्च शिक्षक सल्लागार व आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य आनंद मापुस्कर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : २०२० संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ आजरा असेच गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील शिक्षकाने घ्यावा, असे आव्हान पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या सर्व संचालक तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ करंबळी, प्राचार्य दिनकर घेवडे यांनी केले आहे