गडहिंग्लज : येथील जिल्हा परिषदेचे महाराणी राधाबाई (एम आर) हायस्कूल पुढील वर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या शतक महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. हजारो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या या प्रशालेची इमारत हेरिटेज म्हणून जाहीर केली आहे. या विभागातील शिक्षणाची जननी म्हणूनच या प्रशालेची ओळख आहे या प्रशालेचा शतक महोत्सव दिमाखात करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला शनिवारी (ता. 12) सकाळी दहाला एम आर हायस्कूलच्या सभागृहात शतक महोत्सवी विविध कार्यक्रम आणि कालावधी निश्चित केला जाईल. माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शतक महोत्सवी समितीचे समन्वयक प्राचार्य संजय कुंभार यांनी केले आहे.