अथर्व चे प्रशासन आणि कामगार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे लांबलेला गळीत हंगाम शनिवारपासून सुरू होणार असून प्रशासन आणि कामगार यांच्यातील वाद भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी मिटवला आहे.शनिवारपासून सर्व कामगार कामावर रुजू होणार असल्याने गेल्या महिन्यापासून दौलत सुरू होणार की नाही सुरू असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे.
कामगारांना वाढीव प्रकार आणि बोनस या मुद्द्यांवरून गेले महिनाभर वाद सुरू होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तीन बैठका झाल्या. गुरुवारी जिल्हा बँकेत हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मात्र गुन्हा नोंद असलेले 17 कामगार आणि अन्य तीन कामगारांना कारखाना कॅम्पस मध्ये हजर करून घेणार नाही त्यांनी घरी बसून पगार देऊ वाटल्यास शेती गट कार्यालयात बदली करू पण कारखान्यात घेणार नाही. या प्रशासनाच्या भूमिकेमुळे गुरुवारची बैठक निर्णयाविणार राहिली. मात्र राज्य माथाडी संघटनेचे अध्यक्ष भाजपा कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेऊन अथर्व प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. कामगार नेते आणि शिवाजीराव पाटील यांच्यात सुमारे तीन तास चर्चा झाली. शिवाजीराव पाटील यांनी कामगारांना आपण यापूर्वी दिलेला शब्द प्रशासनाने ऐकलाच पाहिजे असा आग्रह धरला शेवटी प्रशासन आणि सर्व कामगारांना घेऊन कारखाना सुरू करण्याचे मान्य केले.