गडहिंग्लज: येथील धनसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संचालक पदाच्या ११ जागांसाठी तितकेच अर्ज दाखल शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी जाहीर केले. धनसंपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी कायम राहिली.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे :अशोक देशपांडे, किशोर हंजी, उदय जोशी, श्रीकांत महाजन, चंद्रकांत पाटील, कृष्णाजी पाटील (सर्वसाधारण गट) अशोक कुरणे (अनुसूचित जाती) शेवरीन बारदेस्कर, वृषाली मोहिते (महिला) राजाराम हासुरे (भटक्या विमुक्त जाती जमाती), विजय गुरव (इतर मागास). संस्थेने आजपर्यंत केलेला पारदर्शक कारभार व सभासदांचा पतसंस्थेवरील विश्वास यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष उदय जोशी यांनी सांगितले.