गडहिंग्लज : येथील साधना शिक्षण संस्थेचा हिरक महोत्सव २२ व २३ डिसेंबरला आहे. त्याच्या नियोजनासाठी माजी विद्यार्थ्यांची बैठक झाली. बैठकीस माजी शिक्षक ही उपस्थित होते. हीरक महोत्सवा संदर्भात माजी विद्यार्थ्यांकडून अनेक सूचना मांडल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. पर्यवेक्षक आर. एन. पटेल यांनी स्वागत केले. सूर्याजी घोरपडे, सुनील चौगुले, नितीन केसरकर, अनिल देशमुख, सुरेश कोळकी, डॉ. किरण खो, अरविंद बारदेस्कर यांनी मते मांडली. संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी मार्गदर्शन केले. टी. बी. चव्हाण, जी. व्ही. सबनीस, एस. एम. बारदेस्कर, व्ही. एस. धूप, रुजाय बारदेस्कर ,सदानंद पाटणे, वीरूपाक्ष पाटणे, स्वाती कोरी आदी उपस्थित होते. प्राचार्य जी. एस. शिंदे यांनी आभार मानले.