गडहिंग्लज : येथील रवळनाथ को- ऑफ हाउसिंग फायनान्स सोसायटीमध्ये सहकार सप्ताहानिमित्याने महिला आजी-माजी सैनिकांसाठी ' सहकार ठेव योजना ' सुरू केली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौलगे यांनी दिली आहे. ही योजना १८ महिने मुदतीसाठी या योजनेची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर राहणार आहे. यावेळी श्री चौगुले यांनी संस्थेच्या सद्यस्थितीची माहिती देत महिला व सैनिकांच्या घरबांधणीसाठी प्राधान्याने व सवलतीच्या व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो. ठेवी नाही ७ . ७५ टक्के इतके चांगले व्याज आहे. केवळ नवीन ठेवीनसाठीच हा व्याजदर लागू असून गरजेनुसार त्यावर ठेवताना कर्ज घेता येईल अशी माहिती दिली. इच्छुकांनी नजीकच्या शाखेत संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.