गडहिंग्लज : गडहिंग्लज -संकेश्वर मार्गावरील हिटणी येथे दोन बंद घरे अज्ञातांनी फोडून सोने,चांदी, टीव्ही घागरीसह सुमारे ३ लाखाचा ऐवज लंपास केला. मंगळवारी रात्री झालेल्या या घरफोडीने पंचकोशीतील खळबळ उडाली आहे . हिटणी गावातील नवीन ब्लॉक मध्ये राहणाऱ्या सुभाष मल्लाप्पा रुद्रासगोळ हे घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते.चोरट्याने रात्री कडीकोयडा उचलून आत प्रवेश करून ८ तोळे सोने, एलईडी टीव्ही, हंडा आणि रोख ३५ हजार असा ऐवज घेऊन पसार झाले. या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या संजय गुंडाप्पा व्हंजी यांचे बंद घरही चोरट्यांनी लक्ष करत येथेही दाराची कडीकोयंडा उचकून आत प्रवेश करत ८ तोळ्याचे चांदीची मूर्ती, २ तोळ्याची गंडगुंजी, तांब्याच्या २ घागरी असा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. एकाच रात्री या चोऱ्या झाल्या आहेत. याची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली असून तपास हवालदार बाजीराव कांबळे करत आहेत.