गडहिंग्लज: शेंद्री येथील मलिकार्जुन परशराम कांबळे (वय ३१) याने मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी सकाळी १०च्या दरम्यान बड्याचीवाडी गावाच्या हद्दीतील शंकर ईश्वरराव माळी यांच्या शेतात करंजीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला आहे. दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे सिद्धार्थ कांबळे (रा. शेंद्री) यांनी दिलेल्या वर्दीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार रविकांत शिंदे करीत आहेत.