दौलत अथर्वचा ३००१ रु जाहीर

KolhapurLive


चंदगड, ता. १६  : दौलत अथर्व साखर कारखान्याकडून यंदा उसाला प्रति टन ३००१  रुपये दर दिला जाणार असल्याची कंपनीचे युनिट हेड ए. आर. पाटील यांनी सांगितले. यंदाच्या गळीत हंगामात उत्पादनात पहिल्या 11 साखर पोत्यांची पूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
      
      कंपनीकडून चौथा गळीत हंगामा आहे. यंदा सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. एफआरपी पेक्षा जादा दर देऊन कंपनीने उत्पादकांना दिलासा दिल्याचे पाटील यांनी सांगितले वाढीव गळप क्षेत्रात व योग्य नियोजन करून कमी वेळेत ज्यादा गळप करण्याचे निश्चित केले.आहे हंगामा सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचारी तोडणी, वाहतूक यंत्रणा, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. ऊस देऊन सहकार्य करावे असे आव्हान पाटील यांनी केले अध्यक्ष मानसिंग खराटे यांच्या वतीने केले. यावेळी सेक्रेटरी विजय मराठे, चीफ इंजिनियर तळंदगे, चीफ केमिस्ट साळुंखे, के न हेड सदाशिव गदळे, फायनान्स मॅनेजर चव्हाण सुरक्षा अधिकारी साळुंखे प्रभाकर पाटील, मनोहर झेंडे, सुबराव गुडाजी, प्रोजेक्ट हेड कोलवालकर, मिल एक्सपर्ट शरद पाटील, सर्व कॉन्ट्रॅक्टदार कामगार उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण यांनी आभार मानले.