तेरणी जवळ अपघात; तरुण ठार

KolhapurLive

गडहिंग्लज: यमकनमर्डी येथून मटन घेऊन येत असताना तेरणी हत्तरगी रस्त्यादरम्यान तेरणी रस्त्याच्या वळणावर झालेल्या अपघातात इम्तियाज कुतुबुद्दीन मकानदार (वय 40 रा. हलकर्णी) हा तरुण जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. आपला भाचा शोएब यांच्यासह बुलेट घेऊन येत असताना हा अपघात झाला. इम्तियाच्या डोक्याला जबर मार बसला हो.ता या घटनेची वर्दी गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कांबळे करत आहेत.