आजरा : संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी महामार्गाची काम बंद पाडले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काय होणार असा प्रश्न करत यावेळी आंदोलन करण्यात आले.
सध्याच्या रोड बाजूपट्टीची हद्द ही आजही शेतकऱ्यांच्या नावावर आहे. मात्र त्यांना नोटिसा न देता काम चालू केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कडेला असणारी झाडे तोडली. मात्र याच रोडवर फॉरेस्ट खात्याच्या हद्दीतून रस्ता गेला आहे. त्या हद्दीत मात्र फॉरेस्ट खात्याने परवानगी न दिल्याने एकही झाड तोडले नाही. अगर त्याच्या हद्दीतून बाजू पट्टीचे सफाई चे काम हे अद्याप चालू नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्या बैठकीवेळी १८ रोजी आजरा येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी कॉ. शिवाजी गुरव, कॉ.संजय तरडेकर, गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहिते, शिवाजी इंगळे, गणपतराव येसने, निवृत्ती कांबळे, दुंडग्याचे उपसरपंच अण्णासो पाटील, धनगरमोळा सरपंच चंद्रकांत जाखले, यांच्यासह आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी आजरा येथील बायपास कृती समिती व संकेश्वर बांदा महामार्ग शेतकरी संघटना एकत्रित लढा देण्याचे ठरवण्यात आले.