'दौलत' बचाव साठी गुरुवारी शेतकऱ्यांची मोटरसायकल रॅली

KolhapurLive

 चंदगड:अथर्व दौलत साखर कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील शेतकरी गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता तालुक्यात मोटर सायकल रॅली काढून आपल्या वेदना मांडणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संग्राम सिंह कुपेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
    गुरुवारी काढण्यात येणाऱ्या या मोटरसायकल रॅलीचे सुरुवात मजरे कार्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात येणार आहे. दौलत कारखान्याचा तातडीने गळीत हंगाम सुरू करावा, कामगारांनी हा विषय अधिक ताणू नये. कंपनीने आवाहन केल्याप्रमाणे कामगारांनी कामावर रुजू व्हावे. याबाबत जनजागृती करण्यासाठी राजकारण विरहित 'दौलत' बचाव साठी शेतकरी मोटरसायकल रॅली सहभागी होणार आहेत, असे संग्रामसिंह कुपेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.