चंदगड : ता 12 : येथील मनोहर शंकर चंदगडकर यांच्या शेतातील रानडुकराच्या मासाची विक्री करणाऱ्या चौघांवर वन विभागाने धाड टाकून ताब्यात घेतले. संशयित मनोहर चंदगडकर ( वय ५१ ) तुकाराम देसाई (४९, दोघेरी. चंदगड), नितीन लोहार (४५, रा.रवळनाथ गल्ली, चंदगड) समीर चंदगडकर ( ४२ देसाईवाडी, चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील ६५ किलो मांस आणि हत्यारे जप्त करण्यात आली.