किणे येथे आजपासून अखंड हरिनाम : गुरूवारी सांगता

KolhapurLive

किणे : किणे येथे मंगळवारी १९ ते गुरूवारी २१ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. किणे ग्रामस्थ व वारकरी सांप्रदाय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे. ह.भ.- पं. रमेश तेजम महाराज यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा होत आहे. मंगळवारी, १९ रोजी सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिरापासून दिंडी मिरवणुकीची सुरूवात होणार आहे. वारकऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वीणा पूजन, मूर्ती पूजन, कलशं पूजन, तुळस पूजन करण्यात येणार आहे. सप्ताह काळात ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज (तवंदी शिप्पूर), ह.भ.पं. संभाजी चिमुरकर महाराज (मजरे कार्वे), यांचे प्रवचन व किर्तन १९ व २० रोजी होणार आहे. गुरूवारी २१ रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ह.भ.प. चिमुरकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद आहे. या सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन किणे ग्रामस्थ व सांप्रदाय मंडळाने केले आहे.