गडहिंग्लज : लीड कॉलेज क्लस्टर, शिवाजी
विद्यापीठांतर्गत मिनी प्रोजेक्ट स्पर्धा डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे यशस्वीरित्या पार पडल्या. स्पर्धेमध्ये १७ कॉलेजमधून जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सूर्यकांत दोडमिसे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन प्रा. एम. ए. बंदी व प्रा. एस टी दुंडगे यांनी पार पाडले. परीक्षक म्हणून रोबोसेप इनोवेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये ३५ नाविन्यपूर्ण मिनी प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रथम प्रतीक उत्तरेकर व सौरभ पाटील (डी.के.टी.ई. इचलकरंजी), द्वितीय अवधूत आपटे व अनिकेत बिरंजे (डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज भडगाव) व तृतीय क्रमांक वरदराज पाटील व हर्ष देसाई (संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालय, महागाव) यांनी यश मिळवले. यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्य बी- आर. उमराणी, संस्था सचिव स्वाती कोरी, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी अभिनंदन केले.