नौकूड ग्रामपंचायताकडून सॅनिटरी नॅपकिन वाटप

KolhapurLive


हलकर्णी : नौकूड ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना
सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगामधून हा उपक्रम राबवला. नरेवाडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खुशबू मुल्ला यांनी आरोग्य विषयी महिला व युवतींना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. सरपंच शुक्राचार्य चोथे म्हणाले, ग्रामपंचायत व आरोग्य विभागांच्या माध्यमातून महिला, युवतींना आरोग्य सुविधा दिल्या जातात. रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी मदत केली जात असल्याचे सांगितले. त्यावेळी उपसरपंच रेखा सरदेसाई, ग्रा. पं. सदस्या हिराबाई चौगुले, सुवर्णा गोसावी, सुरेखा गुरव, ग्राम संघाच्या अध्यक्ष शितल मांगले, बचत गटांच्या पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.