कोल्हापूर : निवडणूक कव्हरेजमध्ये व्यस्त असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना बऱ्याच वेळा घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा हक्क बजावता येत नाही. हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने दिव्यांग, ज्येष्ठ नागरीकांना ज्यापद्धतीने पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार बहाल केला. त्याच पद्धतीने माध्यम प्रतिनिधींनाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पोस्टाद्वारे टपाली मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे माध्यम प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले आहे. तथापी निवडणूक आयोगाच्या या कक्षेत कोण कोणते माध्यम प्रतिनिधी येतात. याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आयोगाने या संदर्भात लवकरच नोटिफिकेशन काढावे, अशी मागणी होत आहे.