मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ४.५ची नोंद, हिंगोलीतील रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र

KolhapurLive

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात आज सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याचे सांगण्यात आले. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले.