गडहिंग्लज:येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित शहीद दिन संपन्न झाला. प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.एन.बी.इकिले यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या सशस्त्र लढ्यातील आंदोलनाने ब्रिटीश सत्तेला कशाप्रकारे आव्हान दिले याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.एन.आर.कोल्हापुरे यांनी केले. या कार्यक्रमास श्री शंकर कुरळे.प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.ए.जी.हारदारे यांनी आभार मानले.