गडहिंग्लज : येथील साधना महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा केला. यानिमित्त भित्तीपत्रकाचे उद्घाटन केले. कॉमर्स कॉलेजच्या प्र. प्राचार्या व्ही. पी. भिऊंगडे अध्यक्षस्थानी होत्या. अॅड. सुप्रिया गायकवाड यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाद्दल माहिती दिली. प्रा. अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी सावंत, हेमा देसाई, पूजा पटेल, धनश्री कुंभार यांची भाषणे झाली. ऋतुजा पाटील हिने सूत्रसंचालन केले. राशिद खलाशीने आभार मानले.