राज्यात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडत अनेक घोषणा केल्या. त्यानंतर आता अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होईल. विरोधकांकडून घोषणा केल्या, मात्र निधी कुठं आहे असा सवाल करण्यात आला. त्यामुळे आता याचे पडसाद सभागृहातील चर्चेतही उमटणार आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी होत असल्याचाही आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरुनही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा हा आढावा…