प्लास्टिक दुष्परिणामावर घाळी मध्ये कार्यशाळा

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात प्लास्टिक वापर व दुष्परिमावर कार्यशाळा झाली. मुख्याधिकारी स्वरूप खारगे याच्या हस्ते उद्घाटन झाले. वसुंधरा मित्र  मिलिंद पगारे, प्रा. अनिल मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. पगारे म्हणाले, 'प्लास्टिकचे दुष्परिणाम भयंकर आहेत. मनुष्य जात नष्ट हो येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लास्टिकबाबत रिफ्युज, रिडयुस, रियुज व रिसायकलचे धोरण अवलंबावे, असे मत प्रा. मगर यांनी व्यक्त केले. प्लास्टिक न वापरबाबत जनजागृतीसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आव्हान डॉ. पाटील यांनी केले. अनंत पाटील ,डॉ. शिवानंद मस्ती, डॉ. किरण पाटील, प्रा. अश्विन गोडघाटे, प्रा. एस. एस.माने, प्रा. जे. एस. पटेल, प्रा. एस.एस.जाधव यांच्यासह गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचे निवडक विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. डॉ. राजाराम सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सी.डी.लोकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. सिया हिडदुगी यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक जे.एस. जाधव यांनी आभार मानले.