श्री जोमकाई देवीची आज यात्रा

KolhapurLive

उत्तुर, ता. ५ : उत्तुर- चव्हाणवाडी  (ता. आजरा) गावचे ग्रामदैवत श्री जोमकाई देवीची यात्रा सोमवारी (ता.६) होत आहे. उत्तूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील  चव्हाणवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी देवीचे मंदिर आहे. हुताशनी पौर्णिमेला देवीच्या मुख कमलावर सूर्य किरणे पडतात या दिवसाची पर्वणी साधून होळीच्या दिवशी यात्रा साजरी होते.जागरा  दिवशी सायंकाळी पालखी उत्तूर  गावातून निघुन देवालयाकडे जाते.