गडहिंग्लज : बेळगुंदी ( ता. गडहिंग्लज ) येथील श्री दत्त मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा व कळसारोहणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. आशा मगदूम यांनी दत्त मूर्ती अर्पण केली. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्रा. बीना कुराडे यांच्या हस्ते मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यात आली. नूलच्या रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते काळासारोहण झाले. सरपंच तानाजी रानगे व ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मगदूम यांच्या हस्ते श्रीपंत महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण झाले. यावेळी भैरान्ना कानडे, गणपती वांद्रे, गणपती होडगे, रामचंद्र मगदूम, श्रीपती वांद्रे, बाबुराव मगदूम, विष्णू मगदूम, लक्ष्मण घाटगे, शामराव पाटील, प्रकाश कानडे, अजित मगदूम, मारुती पाटील, दिनकर पाटील, तानाजी कुंभार, शिवाजी रानगे, ईश्वर शिंत्रे, राहुल मगदूम उपस्थित होते. तत्पूर्वी, गावातून दत्त मूर्ती व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.