आजरा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षण

KolhapurLive


आजरा, ता. १७ : येथील आजरा महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागातर्फे विद्यार्थिंनीसाठी प्रशिक्षण झाले. महाविद्यालयात तृतीय वर्षातील विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत प्रशिक्षण घेतले. महिंद्रा प्राईड क्लासरुम यांच्या सी. एस. आर. फंडातून नांदी फौंडेशन महाराष्ट्र यांनी तीन दिवसीय शिबिर घेतले. नांदी फौंडेशनच्या उत्तर पश्चिम प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती सीमा भागवत, प्रशिक्षण समन्वयक पंकज दंडगे, प्रशिक्षक श्रीमती अपूर्वा ओक यांनी मार्गदर्शन केले. कौशल्य विकसित कार्यक्रमावर भर दिला. यामुळे भविष्यात व्यवसाय व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, संचालक यांनी प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.