योग विद्या धामतर्फे कार्यक्रम

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. २२ : येथील योग विद्या धाम, भारतीय योग विद्या धाम (नाशिक), महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम झाला. राजू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओजस दड्डी व डॉ. रोहिणी दड्डी दांपत्यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. ५१ सूर्यनमस्कारांनी सुरुवात झाली. १०८ ओंकार जप, महामृत्युंजय जप, गायत्री मंत्र झाले. त्यानंतर डॉ. संजय चौगुले व डॉ. सौ. चौगुले यांच्या हस्ते अग्निहोत्र झाले. अनिल हत्ती, सुनील हत्ती, संस्थाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, कार्याध्यक्ष प्रा. शंकर खाडे, प्रा. गुरुलिंग खंदारे, बाबूराव खोत, विठ्ठल मोरे, बाळासाहेब बडदारे आदी उपस्थित होते. प्रा. सदानंद वाली यांनी आभार मानले. विश्वकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.