गडहिंग्लज, ता. २२ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे : भीमराव पाटील, बाबूराव मधोळी, बाबू जंगली, राजकुमार पाटील, सुभाष यंडरोळे, हणमंत कुंभार, मारुती कुरळे, विनायक कोरे, राजाराम कांबळे, उमा भुसुरी, नसीमाबानू चाँदेखान. सहकार अधिकारी आर. जे. कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव मलाप्पा मरगुद्री यांनी सहकार्य केले.